Pune Wethear : पुण्यात पावसाचा जोर कायम; शहराला ऑरेंज, घाटमाथ्याला रेड अलर्ट

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवसही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः विकेंडला पर्यटनाचा बेत आखणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News)



गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून शहरात जोरदार वारे वाहत होते. दुपारनंतर अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आणि रात्री उशिरापर्यंत त्याची रिपरिप कायम होती.(Weather Update) सततच्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असून तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना पावसापासून बचावासाठी रेनकोटसोबत हलके उबदार कपडेही वापरावे लागत आहेत. (Pune Rain)



यंदाचा जुलै महिना पुण्यासाठी विक्रमी ठरत आहे. जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. 1 ते 22 जुलै या कालावधीत शहरात तब्बल 452.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यात जुलै महिन्यात सरासरी 181.1 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदाचा पाऊस हा सरासरीच्या दुप्पटपेक्षा अधिक झाला आहे. (Maharasshtra Rain)


यापूर्वी 2014 मध्ये जुलै महिन्यात 282.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत निघाला आहे. तसेच 1 जूनपासून आतापर्यंत पुण्यात एकूण 516 मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी जून महिन्यात केवळ 64 मिमी पाऊस झाला होता. जुलै महिना संपण्यास अजून काही दिवस बाकी असतानाच पुण्याने 12 वर्षांतील सर्वाधिक जुलै पावसाचा नवा विक्रम नोंदवला आहे. ( Pune Weather News)


Comments
Add Comment

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील