INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० जिंकण्याचे स्वप्न भंगले, तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

मुंबई: टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० ामन्यात भारतीय संघाला ७ विकेटनी हरवले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान होते. एलिसी हीलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने १८.४ षटकांत ३ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. या पद्धतीने कांगारूंनी ही मालिका २-१ अशी जिंकली. भारतीय संघाने पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते. मात्र शेवटच्या दोन टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.



एलिसा हीली आणि बेथ मूनीने सामना एकतर्फी बनवला


भारताच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात शानदार झाली. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हीली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. एलिसा हीलीने ३८ बॉलमध्ये ५५ धावा केल्या. तर बेथ मूनीने ४५ बॉलमध्ये ५२ धावा करत नाबाद राहिल्या. ताहिला मॅकग्राथने १५ बॉलमध्ये २० धावा केल्या. तर एलिस पॅरी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र फोएबो लिचफील्ड १३ बॉलमध्ये १७ धावांवर नाबाद राहिली.



भारतीय फलंदाजांची निराशा


याआधी ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांचा फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी ४.४ षटकांत ३९ धावा केल्या. यानंतर नियमित अंतराने भारताचे विकेट पडत गेले. भारतासाठी ऋचा घोष हिने सर्वाधिक २८ बॉलमध्ये ३४ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने १७ बॉलमध्ये २६ धावा केल्या.

Comments
Add Comment

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला