पुणे : अत्यंत थरकाप उडवणार्या शरद मोहोळ हत्या प्रकरणात (Sharad Mohol murder case) त्याच्या साथीदारांनीच त्याला संपवल्याचे समोर आले. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, काल शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. तर काल, भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही सुतारदारा येथे मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली.
नितेश राणे यांनी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, “मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केले. सामान्यांच्या अडचणी सोडवल्या. या कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहणे, हे आमचे काम आहे.” प्रसारमाध्यमांनी मोहोळ यांच्याविषयी चुकीची माहिती छापू नये, असे आवाहनही यावेळी नितेश राणे यांनी केले. तसेच मोहोळ खून प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले.
त्यावेळी स्वाती मोहोळ म्हणल्या की, माझा राज्य सरकार आणि प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. माझे पती हिंदुत्ववादाचं काम करत होते, त्यामुळे ही घटना घडली आहे. समोरच्याला जर वाटत असेल की, असे करून मी खचून जाईन. तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. तसेच मला जोपर्यंत मरण येत नाही, तो पर्यंत हिंदुत्ववादासाठी लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
काल देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असताना स्वाती मोहोळ त्यांना डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ जाऊन भेटल्या. स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील आहेत. स्वाती मोहोळ यांनी न्याय मिळावा, अशी मागणी फडणवीसांकडे केली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची भावना व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी होकार कळवत त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असं आश्वासन दिलं.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…