पंतप्रधान मोदींबाबत अपमानजनक विधान करणे पडले भारी, मालदीव सरकारकडून ३ मंत्री निलंबित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप यात्रेची खिल्ली उडवण्यावरून झालेल्या वादाप्रकरणी मालदीव सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालदीव सरकारने पंतप्रधान मोदी आणि भारताबाबत अपमानजनक विधान करणारे मंत्री मरियम शिऊना, मालशा आणि हसन जिहान यांना निलंबित केले आहे. राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जे यांनी त्यांचे हे विधान खाजगी असल्याचे म्हटले होते.


भारताने मालदीव सरकारसोबत अधिकृतरित्या हे प्रकरण उचलून धरले होते. याप्रकरणी मालदीव सरकारने कडक पावले उचलत उप मंत्री(युवा अधिकारिता, सूचना आणि कला मंत्रालय) मरियम शिऊना, उप मंत्री(परिवहन आणि नागरी उड्डाण मंत्रालय) हसन जिहान आणि उप मंत्री(युवा अधिकारिता सूचना आणि कला मंत्रालय) मालशा यांनी निलंबित केले आहे.


मालदीवमध्ये मोहम्मद मुईज्जू याचे नवे सरकार आल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये बिघाड होत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप यात्रेबाबत शेअर केलेल्या फोटोवरून या मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या