नवी दिल्ली: मालदीव्सच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत अपमानजक विधान केले होते. आता मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. नसीद म्हणाले की भारत मालदीव्सच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रमुख सहयोगी आहे आणि अशा विधानाने द्विपक्षीय संबंधांना नुकसान होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
भारतात मालदीवच्या मंत्र्यांकडून झालेल्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मरियम शिऊनाच्या वादग्रस्त विधानावरही रोष व्यक्त केला आहे यानंतर मालदीव आता बॅकफूटवर आला आहे.
याबाबतीत मालदीव सरकारने एक विधान जारी केले आहे, मालदीव सरकार परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानजनक विधानाबाबत ज्ञात आहे. हे मत वैयक्तिक आहे आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. याशिवाय सरकारशी संबंधिक अधिकारी असे विधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात कोणताही संकोच बाळगणार नाही.
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…