Health: या छोट्या बिया मोठ्या कामाच्या, महिलांनी थंडीत जरूर करावे याचे सेवन

मुंबई: तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तिळाचे सेवन थंडीमध्ये केले जाते. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत लोक तिळाचे लाडू, हलवा बनवून खातात. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटमीन ए, सी आणि सोडियम आढळतात.


महिलांनी तिळाचे सेवन जरूर करावे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. जाणून घेऊया तिळाचे फायदे


हाडे मजबूत बनतात- तीळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडाच्या सर्व समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो.


अनियमित पीरियडची समस्या होते दूर - अनेक महिलांमध्ये अनियमित पाळीचा त्रास असतो. याचे मुख्य कारण खराब लाईफस्टाईल. तिळाचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळते. तिळामध्ये फॅटी अॅसिड असतात जे पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करतात.


हार्मोन्स नियंत्रित ठेवतात - तिळामध्ये व्हिटामिन सी आढळते जे शरीरात अॅस्ट्रोजनची पातळी वाढवतात. तीळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलही गुण आढळतात. यामुळे हार्मोन्स नियंत्रित राखण्याचे काम होते.


त्वचेसाठी फायदेशीर - तीळ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. याच्या मदतीने त्वचेला जरूरी पोषण मिळते. यामुळे शरीरात ओलावा कायम राहतो.


एनर्जी वाढते - महिला दिवसभर काही ना काही काम करत असतात ज्यामुळे त्याच्या शरीरात एनर्जीची कमतरता होते अशातच तिळाचे सेवन रोज केल्यास शरीरात एनर्जी वाढते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे