JN.1 Variant : देशात जेएन१ चा झपाट्याने फैलाव; देशात सर्वाधिक रुग्णांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

मुंबई : जेएन१ (JN.1) चा व्हेरिएंटचा राज्यात झपाट्याने फैलाव होत आहे. राज्यातील रुग्णसंख्या ही काल गुरुवारी ४ जानेवारी केलेल्या नोंदीनुसार ११० वर पोहचली असून सर्वाधिक रुग्णांमध्ये महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे कालच्या दिवसात राज्यात नव्या १७१ कोरोनाबाधितांची (Corona patients) नोंद करण्यात आली आहे आणि कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


पुण्यात या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कारण ११० पैकी ९१ रुग्ण हे एकट्या पुण्यात आहेत. ठाण्यामध्ये जेएन१ व्हेरियंटचे ५ रुग्ण तर बीडमध्ये ३ रुग्ण आढळून आलेत. काल कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सोलापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एका ७३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णाला मधुमेह, रक्तदाब आणि दमा या समस्या होत्या, अशी माहिती देण्यात आली आहे. या व्यक्तीने कोविड लासिकरणाचे दोन डोस घेतले होते. दरम्यान, कोरोनामुळे मृत पावलेली दुसरी व्यक्ती कोल्हापुरातील आहे. या व्यक्तीचे वय १०१ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला हृदयरोगाच्या समस्या होत्या. या व्यक्तीने कोविड लासिकरणाचे डोस घेतले नव्हते, अशी माहिती देण्यात आली आहे.



देशात जेएन१ चे ३१२ रुग्ण


जेएन१ प्रकार हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात या नवीन जेएन१ सब-व्हेरियंटचे ३१२ रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. देशातील जेएन१ सब-व्हेरियंटच्या एकूण रुग्णांपैकी ४७ टक्के प्रकरणे केरळमध्ये आढळल्याने प्रशासन अलर्टवर आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,५६५ वर पोहोचली आहे.



प्रत्येक राज्यात किती रुग्ण?


आतापर्यंत भारतात दहा राज्यांमध्ये जेएन१ सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. ज्यात सर्वाधिक रुग्णांमध्ये केरळनंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे, कालपर्यंत नोंद करण्यात आलेल्या प्रत्येक राज्यातील जेएन१ रुग्णांची संख्या -


केरळ - १४७
महाराष्ट्र - ११०
गोवा - ५१
गुजरात - ३४
तामिळनाडू - २२
दिल्ली - १६
कर्नाटक - ८
राजस्थान - ५
तेलंगणा - २
ओडिशा -१

Comments
Add Comment

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक

जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द

श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात