मुंबई: बॉलिवूडची लेडी स्टार म्हटली जाणारी दीपिका पदुकोण(deepika padukone) आज आपला ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. २००८मध्ये आलेल्या ओम शांती ओम या सिनेमातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. गेल्या १६ वर्षांपासून दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. मात्र फिटनेसच्या बाबतीत ती आजही पहिल्यासारखीच फिट दिसते.
खाण्याची शौकीन दीपिका स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवते. जर तुम्हालाही दीपिकासारखी बॉडी हवीये तर दीपिकाचा डाएट प्लान आणि फिटनेस रूटीन फॉलो करावे लागेल.
फिटनेस फ्रीक दीपिका पदुकोण दिवसातून ६ वेळा खाते. अभिनेत्री सहा वेळा थोड्या थोड्या प्रमाणा जेवते. दीपिकाच्या दिवसाची सुरूवात कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून होते. यानंतर ती ब्रेकफास्टमध्ये २ इडली अथवा प्लेन डोसा अथवा उपमा त्यासोबत २ अंडी, २ बदाम घेते. याशिवाय ती नेहमी १ एक लो फॅट मिल्कही घेते.
लंचमध्ये दीपिकाला घरचे जेवण पसंत आहे. यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. ती रोज डाळ, रोटी, भाजी खाते. यासोबतच ती दहीही खाते. दरम्यान, हे सर्व ती एका मर्यादित प्रमाणात घेते. ती स्वत:ला हायड्रेट ठेवण्यााठी मध्ये मध्ये नैसर्गिक ज्यूस, नारळ पाणी अथवा स्मूदी घेते.
दीपिकाचा संध्याकाळचा नाश्ता खूप हेल्दी असतो. ती बदामसह अन्य नट्सही खाते. याशिवाय तिला फिल्टर कॉफी प्यायला खूप आवडते.
दीपिका रात्रीच्या जेवणात फार कमी खाते. ती रात्रीच्या जेवणात दोन चपाती, हिरवी भाजी आणि सलाडचे सेवन करते. यासोबतच ती फळाचेही सेवन करते.
दीपिकाला खाण्याची प्रचंड आवड आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो याची साक्ष देतात. डेझर्टमध्ये तिला चॉकलेट खायला आवडते. तसेच हेल्दी डाएटसोबत दीपिका जोरदार एक्सरसाईजही करते. स्वत:ला शेपमध्ये ठेवण्यासाठी दीपिका दररोज योगा करते.fit
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…