मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) हिच्या लग्नाची चर्चा आहे. तिचं केळवण, नेसलेली नऊवारी साडी ते तिने मराठीत घेतलेला उखाणा इथपर्यंत सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या. त्यामुळे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल इरा खान मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विवाहबंधनात अडकली. नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी इराने सुंदर धोती चोली ड्रेस परिधान केला होता, तर नुपूर मात्र शॉर्टस् आणि सॅण्डो (Shorts and Sando) घालून बसला होता. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
लग्नापूर्वी नुपूर शिखरे शॉर्टस् आणि सॅण्डो घालून मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसला. घरातून धावत तो लग्नस्थळी पोहोचला. नंतर त्याने ढोल वाजवत मनसोक्त डान्स केला. पाहुण्यांच्या आणि कुटुंबियांच्या गर्दीत तो डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इरा – नुपूरच्या या अनोख्या वरातीची जोरदार चर्चा होत आहे.
लग्नात इराची आई रीना यांनी छानसा ड्रेस घातला होता, तर आमिरने लेकीच्या लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व धोती निवडली होती. किरण राव सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर, नुपूर शिखरेच्या आई प्रीतम शिखरे यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. नुपूर व इराच्या लग्नाला मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी देखील हजेरी लावली. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक बॉलीवूडकर हजेरी लावणार आहेत.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…