मुंबई : राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एलपीजी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एलपीजी, पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…