मुंबई : आमंत्रणावर आम्ही राजकारण कधीच केलं नाही, असं वक्तव्य आज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षणावरुन केलेल्या राजकारणाची आठवण करुन देत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा हा एक फ्लॉप शो आहे, असं परखड मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.
नितेश राणे म्हणाले, कदाचित गजनी झालेल्या या संजय राऊतला मी आठवण करुन देईन की त्याचा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा याच आमंत्रणांमध्ये मग त्यात मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेता आणि मेट्रोचं जाळं पसरवण्यात महत्त्वाची भूमिका असलेले देवेंद्र फडणवीस यांना का वगळण्यात आलं? बाळासाहेबांच्या स्मारकासाठी लागणार्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मिळवून दिल्या होत्या. मग तरीही त्यांना का वगळलं? असे रोखठोक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.
आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलावलं नाही म्हणून थयथयाट करणारे संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्येच्या सातबारावर उद्या भाजपचं नाव लागेल, असं बोलण्याची हिंमत करतात. मग तुझ्या मालकाने जेव्हा मुख्यमंत्री असताना सिद्धीविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून भावोजीला बसवलं होतं, तेव्हा सिद्धीविनायकच्या सातबार्यावर तुझ्या मालकाने आपलं नाव कोरायचा प्रयत्न केला होता ना? कारण तेव्हा सिद्धीविनायक ट्रस्ट हे तुझा मालक आणि पाटणकर कुटुंबियांसाठीच चालायचं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
पुढे ते म्हणाले, सर्वसामान्य आणि गणपतीच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट कुठेही वापरलं गेलं नाही. कोरोनाच्या काळात बाकी सर्वांना दर्शन बंद होतं, पण उद्धव ठाकरे आणि पाटणकर यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन कसं सुरु होतं? कोरोनाच्या वेळी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती उत्सवासाठी सिद्धीविनायक मंदिरातील सर्व पुजारी ११-११ दिवसांसाठी आणून बसवले होते. त्यांना तिथे राहण्याची सोय केली होती. सिद्धीविनायकचा सातबारा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी त्याने कसा प्रयत्न केला याची मी १०० उदाहरणं देऊ शकतो, असं नितेश राणे म्हणाले.
ज्यांनी ज्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं म्हणून रक्त सांडलं, घाम गाळला त्या सगळ्यांसाठी २२ जानेवारी महत्त्वाचा दिवस आहे आणि रामदेवतेनेच ठरवलं आहे की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये. तुझ्या मालकासारख्या पापी लोकांना आमचा राम देवच तिथे बोलावणार नाही. म्हणूनच आता आमंत्रणासाठी तुला भुंकायला लागतंय, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
राहुल गांधीची भारत न्याय यात्रा ही नवीन यात्रा हा पुन्हा एकदा एक फ्लॉप शो आहे. मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही इंडिया अलायन्सच्या नावाने एनडीएच्या विरुद्ध लढताय, मग स्वतःच्या यात्रेला नाव देण्याची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं नाव का दिलं नाही? काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्स मान्य नाही का? काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवायचंय का? याची उत्तरं राहुल गांधी देणार नसतील तर काँग्रेसची अधिकृतरित्या चाटूगिरी करणार्या भांडुपच्या संजय राऊतने तरी याची उत्तरं द्यावीत, असं नितेश राणे म्हणाले.
भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमध्ये निघाली होती, तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला आहे. आता ते मणिपूर ते मुंबई यात्रा काढणार आहेत. म्हणजे मणिपूर ते मुंबईपर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव अटळ आहे, असं नितेश राणे म्हणाले.
राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी घाम, अश्रू गाळले, रक्त सांडलं पण आता जे काही आहे ती फक्त भाजपची प्रचारयंत्रणा आहे, असं संजय राऊत म्हणाले. या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊतचा घाम कुठे कुठे गळतो हे आता गोरेगावच्या रॉयल फार्म्सच्या स्टाफला विचारावं लागेल. अयोध्येसाठी प्रत्येक हिंदूने ज्याला राम मंदिर व्हावं अशी भावना होती, त्या प्रत्येक हिंदूचं घाम आणि रक्त सांडलेलं आहे. मग तो कोणत्या पक्षाचा किंवा संघटनेचा नव्हता. उद्धव ठाकरे आणि घामाचा काही संबंध नाही. २४ तास एसीमध्ये बसणार्या उद्धव ठाकरेचा घाम कधी गळतो हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. म्हणून या जिहाद्यांचा राम मंदिराबद्दल बोलण्याचा काही अधिकार राहत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
राम मंदिर हा एका पार्टीचा विषय झाला असून रामलल्लाला त्यांनी किडनॅप केलं आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्याचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, किडनॅपसारखी खालच्या दर्जाची भाषा रामलल्लाबद्दल वापरताना संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. तो किती हिंदूद्वेषी आहे, हे या वक्तव्यावरुन कळतं. आमच्या देवाला कोणीही किडनॅप करु शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, याच्यासारख्या मुल्ला लोकांना हे कळणार नाही, असं नितेश राणे यांनी ठणकावलं.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…