Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीNana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

Nana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हल्ली त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यांमुळे (Political statements) चर्चेत येत राहतात. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The vaccine war) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. सध्या ते त्यांच्या आगामी ‘ओले आले’ (Ole ale) या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच त्यांनी एक राजकीय भाकीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच निवडून येणार’, असा दावा त्यांनी केला आहे.

एका वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. देशभरात हे सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. तसेच भाजपाला पर्याय नाही. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, यात काही शंका नाही”, असं वक्तव्य नाना यांनी केलं आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. चारपैकी तीन राज्यांत भाजपने बाजी मारली. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात होती. त्यात घवघवीत यश मिळवल्याने भाजप लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी भाजपला बहुमत मिळणार असं वक्तव्य केल्याने आता हे भाकीत खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -