Devendra Fadnavis : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांचीही डॉक्टर म्हणून नवी ओळख

  120

देवेंद्र फडणवीस यांना मिळणार जपानकडून डॉक्टरेट; आज मुंबईत होणार सोहळा


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राची मान उंचावेल अशी अनेक कामे आतापर्यंत केली आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल थेट जपानच्या विद्यापीठाने घेतली आहे. जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून (Koyasan university, Japan) फडणवीसांना मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान केली जाणार आहे. आज संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.


काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते. जपान आणि भारतातले संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर आज जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.


देवेंद्र फडणवीसांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही यापूर्वी मिळाली मानद डॉक्टर पदवी


याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली होती. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी ही मानद उपाधी कुलपती डॉ. विजय पाटील यांनी प्रदान केली होती. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळमधील महापूर, महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य, कोल्हापूर, महाड येथील पुरावेळी कार्य अशा अनेक कार्यांसाठी शिंदे यांना गौरवण्यात आले होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डॉक्टरेट जाहीर झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनाही मानद डॉक्टर म्हणून नवी ओळख मिळाली आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही