Friday, April 17, 2026

Nanded Train Fire : नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला भीषण आग

Nanded Train Fire : नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला भीषण आग

आगीचे कारण अस्पष्ट

नांदेड : महाराष्ट्रातील नांदेडजवळ आज पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला (Purna-Parli Passenger Train) भीषण आग लागली. मेंटेनन्स यार्डमध्ये ही ट्रेन उभी होती. त्याचवेळी या ट्रेनमधील एका डब्यात (luggage-cum-guar van coach) आग लागली. ट्रेन रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आहे. मात्र, आगीचे कारण समजू शकलेले नाही.

आगीच्या घटनेबाबत दक्षिण मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या घटनेत आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेनंतर ३० मिनिटांत आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >