शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर दीर्घमुदतीसाठी घेऊन ठेवले तर गुंतवणूकदारांना ते नेहमीच चांगला फायदा करून देत असतात. यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसीसनुसार चांगल्या कंपन्या निवडून टप्प्याटप्प्याने सातत्याने ते शेअर्स खरेदी करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते. ‘सन फार्मा’ ही आज आघाडीची औषधी निर्माण करणारी कंपनी असून १९८३ ला या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला या कंपनीने मानसिक आजारावर काम करणाऱ्या केवळ ५ औषधांची निर्मिती करून कंपनीला सुरुवात केली.
आज प्रामुख्याने हृदयाचे आजार, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, किडनीचे आजार, मानसिक आजार यावरील औषध निर्मितीचे काम ही कंपनी करते. आज जवळपास २००० पेक्षा अधिक उत्पादने या कंपनीची असून या एकूण उत्पादनांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त विक्री ही बाहेरील देशांमध्ये होते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्न हे अमेरिकेतून येते. १९९४ साली आय.पी.ओद्वारे या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला. भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीने १९९७ मध्ये अमेरिकेतील ‘कँराको’ ही कंपनी ताब्यात घेतली. ‘सन फार्मा’ या कंपनीने ताब्यात घेतलेली ही त्यांची पहिलीच ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ होती. त्यानंतर मधल्या काही वर्षात मिल्मेट लॅब, गुजरात लायका या कंपन्याचा ताबा त्यांनी घेतला. २०१० ते २०१२ च्या दरम्यान ‘सन फार्मा’ ने दुसा फार्मा, तरो फार्मा आणि युआरएल फार्मा या मोठ्या कंपन्याचा ताबा घेतला.
२०१४ हे वर्ष या कंपनीसाठी अतिशय सोनेरी ठरले. याच वर्षी सन फार्माने औषधी क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कंपनी “रॅनबॅक्सी” हिचा ताबा घेतल्याची घोषणा केली. केवळ भारतातच नव्हे; तर जागतिक बाजारपेठेमध्ये देखील या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगातील पहिल्या पाच क्रमाकांमध्ये ‘सन फार्मा’ जावून बसली.
आज औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये ‘सन फार्मा’ जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास ५०,००० पेक्षा अधिक लोक या कंपनीत काम करतात. जगभरातील ६ खंडात या कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. मागील वर्षी ‘वेजमन’ या संस्थेच्या सहकार्याने मेंदूच्या आजारावर उपचार व संशोधनात या कंपनीने प्रवेश केला आहे. ‘सन फार्मा’ या कंपनीची आणखी काही उत्पादने ही यू.एस.च्या अन्न व औषधी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या फंडामेंटल अॅनालिसीसनुसार जरी भारतीय निर्देशांक महाग असला तरी शेअर बाजारात आगामी काळातील प्रत्येक घसरणीत ‘सन फार्मा’चे शेअर्स प्रत्येक टप्प्याला खरेदी करीत गेल्यास आज १२४३ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर पुढील ५ वर्षांचा विचार करता गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. आपण आपल्या या आठ वर्षांच्या लेखमालेत हा शेअर ७७९ आणि ४८० रुपये किमतीला असतानादेखील खरेदी योग्य सांगितलेला होता आपण सांगितल्यानंतर ५ वर्षांतच हा शेअर दुप्पट झालेला आहे. दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते. टेक्निकल अॅनालिसीसनुसार जरी निर्देशांकाची दिशा तेजीची असली काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्याचा विचार करता जर निफ्टी २०,७०० या महत्त्वाच्या पातळीच्या खाली आला तर मात्र निर्देशांकात घसरण होवू शकते. ‘कॅस्ट्रोल इंडिया ’ या शेअरने १६२ ही अत्यंत महत्त्वाची पातळी ओलांडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार सक्षम तेजीची दिशा दर्शविलेली आहे. आज १६२.५५ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर मध्यम मुदतीचा विचार करता २०० रुपयांपर्यंत तेजी दर्शवू शकतो.
अल्प व मध्यम मुदतीसाठी शेअर्स खरेदी करीत असताना नेहमी योग्य स्टॉपलॉस लावूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)
samrajyainvestments@gmail.com
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…