Friday, October 4, 2024
Homeक्रीडाKieron Pollard: टी-२० विश्वचषकात इंग्लंडची मदत करणार किरेन पोलार्ड

Kieron Pollard: टी-२० विश्वचषकात इंग्लंडची मदत करणार किरेन पोलार्ड

मुंबई: वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑलराऊंडर किरेन पोलार्ड टी-२० विश्वचषक २०२४मध्ये इंग्लंडची मदत करणार आहे. त्याला या स्पर्धेसाठी इंग्लंडचा सहप्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. कोचिंग स्टाफमध्ये पोलार्ड असल्याने इंग्लंडच्या संघाला स्थानिक परस्थितींचा अधिक फायदा उचलण्यास मदत मिळेल.

खरंतर पुढील टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. अशातच इंग्लंडने अशा टी-२० स्पेशालिस्टला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये जागा दिली ज्यांना स्थानिक परिस्थितींबद्दल माहिती असेल. येथे किरेन पोलार्डशिवाय दुसरा कोणी चांगला असूच शकत नाही.

टी-२०मधील मोठा खेळाडू

पोलार्ड वेस्ट इंडिजच्या त्या संघाचा भाग होता ज्यांनी २०१२मध्ये टी-२० विश्वचषक जिंकून दिला होता. त्याने टी-२० विश्वचषक २०२१मध्ये विंडीजच्या संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याने विंडीज संघासाठी एकूण १०१ सामने खेळले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर निवृत्ती घेतली आहे मात्र आता तो फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळत आहे.

पोलार्डने नुकत्याच झालेल्या अबूधाबी टी१० लीगमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला आपल्या नेतृत्वात चॅम्पियन बनवले होते. तो आपला संघ त्रिनबागो नाईट रायडर्सला कॅरेबियन प्रीमियर लीग २०२३च्या फायनलपर्यंत घेऊन गेला होता. त्याने आंतरराष्ट्रीय लीग टी-२०मध्ये मुंबई इंडियन्स अमिरातचे नेतृत्वही केले आहे. सोबतच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सा बॅटिंग कोचही आहे.

टी-२० आणि वनडेत फ्लॉप इंग्लंडचा संघ

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडचा संघा गतविजेता म्हणून उतरेल. टी-२० चॅम्पियन इंग्लंड सध्या सफेद बॉलने खेळवल्या जाणाऱ्या दोनही फॉरमॅटमध्ये फ्लॉप होत आहे. विश्वचषक २०२३म्ये त्यांनी केवळ ९ पैकी ३ सामने जिंकले होते. नुकत्याच झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -