Alia-Ranbir daugher first look : आलिया आणि रणबीरची चिमुकली पाहिलीत का? पाहा व्हिडीओ

ख्रिसमसनिमित्त पहिल्यांदाच आली पॅपराझींसमोर


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह केला आणि एका वर्षातच ६ नोव्हेंबरला या जोडीने गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहते या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक होते. या मुलीचं नाव 'राहा' (Raha Kapoor) ठेवण्यात आलं. नुकताच ६ नोव्हेंबरला तिचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला. मात्र, या दोघांनीही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना अद्याप दाखवला नव्हता.


आज ही जोडी त्यांच्या मुलीसह ख्रिसमसनिमित्त (Christmas) लंच प्रोग्रॅमसाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पॅपराझींसमोर (Paparazzi) येत आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला. राहाच्या गोंडस हालचाली कॅमेर्‍यात कैद झाल्याने चाहते खूश झाले आहेत. पांढर्‍या रंगाचा फ्रॉक, दोन पोनीटेल, पिंक हेअरक्लिप्स, रेड शूज अशा लूकमध्ये राहा खूपच क्युट दिसत आहे.





राहाचे फोटो आणि व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा (Likes and comments) वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई