शाळेची चौकशी प्रलंबित असताना शाळा हस्तांतरणाचा डाव ?

राज्य बाल हक्क आयोगाच्या आदेशाला तिलांजली दिल्याचा संशय


नाशिक (प्रतिनिधी) - शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे काही पालकांनी बॉईज टाऊन पब्लिक स्कूल नाशिक या शाळेबाबत जून महिन्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणी सुनावणी झाली असून सुनावणी इतिवृत्तानुसार शाळेची मान्यता काढण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ.) / (माध्य.) जिल्हा परिषद नाशिक यांना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आरटीई २००९ नुसार मान्यता काढण्याच्या संदर्भात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मागील ६ महिन्यांपासून शाळेची चौकशी प्रलंबित असून अंतिम अहवाल दाखल करण्यात चौकशी समिती अध्यक्ष कसूर करीत असल्याचा आरोप तक्रारदार पालकांनी केला आहे.


तक्रार प्रलंबित असताना नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सबंधित शाळा जालना येथील अन्य संस्थेस कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास कशी काय मंजुरी दिली ? याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच सोमवार पासून शिक्षण उपसंचालक महोदय नागपूर येथे असताना २० डिसेंबर रोजीचे पत्र कोणाच्या सहीने निर्गमित झाले याबाबत जनमानसात संभ्रम आहे.


शाळा हस्तांतरण बाबत स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीने आता शाळा हस्तांतरणाच्या प्रकरणातील गूढ लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा