Sunil Kedar : पाच वर्षांची शिक्षा ऐकून काँग्रेस मंत्री सुनील केदार यांना बसला धसका?

  210

तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखणे सुरु झाल्याने रात्री उशिरा रुग्णालयात दाखल


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur Bank scam) मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केदार लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, त्याला न जुमानता कोर्ट पाच वर्षांच्या शिक्षेवर ठाम राहिले आहे. शिवाय केदार यांची आमदारकी रद्द होणार का असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा संपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे असेल.


दरम्यान, शिक्षा सुनावणीनंतर न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे मंत्री सुनील केदार यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले. तेव्हा त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची त्यांनी काल तक्रार केली. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहेत. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर नागपूर बँक घोटाळ्यातील इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.



काय आहे प्रकरण?


नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काल लागला. यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. या प्रकरणात केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची