ओरोस (प्रतिनिधी) : राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचे काय योगदान होते याचा पुरावा द्यावा. आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत बसले होते. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊत राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात जे लेख लिहिलेत ते मी दाखवू शकतो. अशा पापी लोकांना, चपट्या पायाच्या लोकांना एवढ्या पवित्र स्थानी आणू नये अशी मागणी मी करेन, असे आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना केली.
ओरोस येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, स्वतःचा मालक नालायक आहे, हे संजय राऊत सांगणार नाही. तुझ्या मालकाने लोकप्रतिनिधींना वेळ दिला असता आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी करत बसला नसता. कर्जतच्या फार्महाऊसवर पैसे जमिनीच्या खाली साठवत बसला नसता तर अशा पद्धतीने केस लढविण्याची वेळच आली नसती. त्यामुळे इतर आमदारांवर टीका करण्यापेक्षा तुझा मालक नालायक आहे, असे बोल आणि पुढे जा, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
२४ तारखेला अल्टीमेंटम देण्याची भाषा जरांगे करत आहेत. जरांगे पाटील मुंबईला येणार नाहीत. असा मला समाज बांधव म्हणून विश्वास आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाच्या ९९ टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र सरसकट आणि आईच्या नात्यातल्या लोकांना आरक्षण देण्याची जी मागणी आहे. ती शक्य नाही हे आमच्या गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे जरांगेनी भविष्याचा विचार करून मोठ्या मनाने आंदोलन संपवावे. आता अल्टीमेंटम देण्याची वेळ राहिलेली नाही तर आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे.असे आमदार नितेश राणे सांगितले.
टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. कोणताही सर्वे लगेच होत नाही. २४ तासाचे आरक्षण हवे असेल तर सरकार देऊ शकते. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार द्यायचे असल्याने वेळ लागत आहे. त्याचा जरांगेनी विचार करावा. मुंबईमध्ये आंदोलन करणे सोपे नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. अण्णा हजारे यांनीदेखील राम लीला वर आंदोलन केले ते गाजले. मात्र मुंबईत काय झाले ? त्यामुळे जरांगे पाटील यांनी स्वतःच्या मनाला विचार करून निर्णय घ्यावा. इकडे तिकडे बघून निर्णय घेऊ नये, असा मी समाज बांधव म्हणून सल्ला देईन, असे ते म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन हे जेष्ठ नेते आहेत. त्यांना अनुभव आहे. त्यांना कायदा कळतो. टिकणारे आरक्षण पाहिजे. महाजन यांचे अनुभवाचे बोल जरांगे – पाटील यांनी ऐकावे आणि पुढे जावे. शिंदे समिती राज्यभराचे दौरे करत आहेत. घाई गडबडीने कुठलाही रिपोर्ट तयार केला तर कोर्टात स्टे भेटणार त्यामुळे वेळ हवा आहे. आम्हाला टाईमपास करायला नाही तर पिढ्यानपिढ्या टिकणार आरक्षण द्यायचे आहे. म्हणून तो वेळ मागितला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना सांगेन, आता बस करा. तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता जल्लोष करण्याची वेळ आलेली आहे.
प्रत्येक काँग्रेसचा नेता घोटाळ्यामध्ये पकडला जातोय. किंवा त्यांचा घरात रोकड मिळत आहे. काँग्रेसच्या बाबतीत आश्चर्याची बाब नाही. प्रत्येक काँग्रेस च्या नेत्याची कुंडली उघडली तर त्यात असेच भ्रष्टाचार सापडणार.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचार करून बोलावे. आरक्षणाच्या मारेकऱ्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…