नवी दिल्ली : लोकसभेत (Loksabha) दोन तरुणांनी स्मोक कँडल्स जाळून घातलेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षांच्या गोंधळी खासदारांना निलंबित (MPs Suspension)करण्याचं सत्र सुरुच आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी काँग्रेसच्या तीन खासदारांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून (Winter Session) निलंबित केलं. आतापर्यंत लोकसभेचे आणि राज्यसभेचे (Rajyasabha) मिळून १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेसचे खासदार नकुलनाथ (Nakulnath), डीके सुरेश (D K Suresh) आणि दीपक बैज (Deepak Baij) अशा तीन खासदारांना आज लोकसभेतून निलंबित केलं गेलं. आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे सांगत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली.
घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांवर लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचे नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईन. ही पद्धत योग्य आहे का? हीच सभागृहाची प्रतिष्ठा आहे का? हे योग्य नसल्याचे लोकसभा अध्यक्षांनी म्हटले.
संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर १४ डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली. १४ डिसेंबरला विरोधी बाकांवरील १३ खासदार, १८ डिसेंबर रोजी ३३ खासदार, १९ डिसेंबरला ४९ खासदार आणि २० डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्याचवेळी १४ डिसेंबरला राज्यसभेतून ४५ आणि १८ डिसेंबरला एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं.
राज्य सरकारमध्ये कार्यरत असणाऱ्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय आस्थापनेचे कर्मचारी, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी…
ज्येष्ठ विश्लेषक : अभय गोखले पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा…
वृषाली आठल्ये : मुंबई ग्राहक पंचायत ७५ वर्षांच्या एका निवृत्त कर्नल यांना एका सायबर गुन्हेगारांनी…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये दिल्लीचा विजयरथ कायम आहे. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स…
मुंबईत ७५ हजार पेटी हापूसची आवक मुंबई(प्रतिनिधी) : हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील हापूस आंब्याच्या…
उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. शेखर…