Arjun Award 2023: अर्जुन पुरस्कार मिळाल्याच्या घोषणेनंतर शमीच्या गावात जल्लोष, वाटली मिठाई

  132

मुंबई: क्रीडा मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय खेल पुरस्कार २०२३ची(arjun award 2023)  घोषणा केली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाचा समावेश आहे. त्याने २०२३ या वर्षात शानदार कामगिरी केली. यासाठी त्याला यंदाचा अर्जुन पुरस्कार २०२३ देण्यात येत आहे. ९ जानेवारी २०२४मध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.


देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जाईल. यूपीच्या अमरोहामध्ये मोहम्मद शमीला पुरस्कार दिल्याची घोषणा झाल्यानंतर जल्लोषाचा माहौल आहे. त्याचे कुटुंबीय आनंद व्यक्त करत आहेत.


पुरस्काराची घोषणा होताच गावातील लोकांना एकमेकांना मिठाई भरवत अभिनंदन केले. मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या होत्या आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला अर्जुन अवॉर्डसाठी निवडण्यात आले.



क्रीडा मंत्रालयाने केली घोषणा


क्रीडा मंत्रालयाने घोषणा केली आहे की मेजर ध्यानचंद खेल रेत्न पुरस्कार २०२३ भारतीय शटलर चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक राई राजला बॅडमिंटनमधील योगदानासाठी दिला जाईल. मोहम्मद शमीसह अन्य २६ खेळाडूंना खेळ आणि खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२३मध्ये अर्जुन पुरस्कार दिला जाईल.

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून