संशयित आरोपीचे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन

इंदिरा नगर पोलिसांत गुन्हा दाखल


सिडको : इंदिरा नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला एक संशयित आरोपी पोलीस स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारत फरार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत इंदिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील साठेनगर येथे रहाणारा विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे याला एका गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल कीशोर रामदास देवरे (वय 43 वर्ष नेमणुक इंदिरानगर पोलीस स्टेशन) हे पोलीस चौकी येथे रात्र कर्तव्यावर आहे. दि. 18/12/2023 रोजी तपासावर असलेला गुन्हा क. 372/23 कलम 457,380 भादवी मध्ये आरोपी नामे विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे वय 20 वर्ष रा म्हसोबा मंदीर जवळ, साठेनगर, वडाळागाव नाशिक यास क्राईम युनिट 2 चे पोउपनि संजय पाडवी यांनी त्यांचे कडुन रीपोर्टसह पोलीस ठाणे अमलदार यांचेकडे 17.25 वा. हजर केले. सदर आरोपीस पोलीस ठाणे अमलदार पोहवा / 165 झीरवाळ यांचे कडुन इंदिरा नगर पोलिसांनी 21.00 वा. ताब्यात घेवुन आरोपीस गुन्हयासंदर्भाने तिचारपुस केली. अधिक तपासाकरीता आरोपीस अटकेची आवश्यकता असल्याची खात्री झाल्याने त्यास त्याचे अटकेचे कारणे सांगितली.अटकेचा पंचनामा केला तसेच त्याचा धाकटा भाऊ अरुण ज्ञानेश्वर तीनबोटे यास फोन वर अटकेबाबतची माहीती दिली. 23.24 वा. सुमारास आरोपीची अटकेची नोंद स्टेशन डायरीला घेतल्यानंतर आरोपीस अंबड पोलीस स्टेशनचे लॉकअपला नेण्याची तयारी करत असतांना आरोपीने पाणी पिण्यास मागितल्याने आम्ही त्यास पोलीस स्टेशनचे चॅनेल गेटजवळील पाणी फील्टर जवळ येवुन त्यास पिण्यासाठी पाणी देत असतांना त्याने पोलिसाला धक्का दिला व तो चॅनेलगेटचे बाहेर संरक्षित भींतीवरुन उडी मारुन पळुन गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन आला नाही.तरी दि. 18/12/2023 रोजी 23.24 वा सुमारास गुन्हा क्र. 372/23 कलम 457,380 भादवी मधील आरोपी नामे विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे वय 20 वर्ष रा म्हसोबा मंदीर जवळ, साठेनगर, वडाळागाव, नाशिक याने त्याची सदर गुन्हयात होत असलेली अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या कायदेशीर हवालतीमधुन पळुन गेला म्हणुन त्याचेविरुध्द भादवी कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : डिजिटल चोरांचा नवा फंडा ! चोरीची रक्कम थेट पेट्रोलपंपांच्या खात्यात; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड

नाशिक : सायबर गुन्हेगार (Cyber criminals) नागरिकांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे शोधत असतात. आता या डिजिटल चोरांनी चोरीचा नवा

Ashok Kharat : विश्वास बसणार नाही ! नावही तेच अन... ; शिर्डीत आणखी एक भोंदू अशोक खरात समोर

Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात हा राज्यात काय तर देशात चर्चेत आहे. अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे.

Nashik : सीएचे अपहरण, बेल्टने मारहाण अन् १८ लाखांची खंडणी! नाशिकमध्ये थरारक गुन्ह्याने खळबळ

Nashik : नाशिक शहरात घडलेल्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटचे तब्बल १८ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळा समन्वयकपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 : पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने

Nashik : नाशिक विभागात फक्त पाच महिने पुरेल इतकाच चारा ! पाऊस लांबल्यास पशुपालकांपुढे संकट ?

नाशिक : नाशिक विभाग अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. अशातच नाशिक विभागासाठी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली

Nashik : नाशिकच्या विकासगंगेत प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे: महापौर हिमगौरी आहेर

Nashik : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ न शकलेले भाविक नाशिकच्या कुंभोत्सवात सहभागी होतील.