संशयित आरोपीचे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन

  49

इंदिरा नगर पोलिसांत गुन्हा दाखल


सिडको : इंदिरा नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला एक संशयित आरोपी पोलीस स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारत फरार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत इंदिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील साठेनगर येथे रहाणारा विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे याला एका गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल कीशोर रामदास देवरे (वय 43 वर्ष नेमणुक इंदिरानगर पोलीस स्टेशन) हे पोलीस चौकी येथे रात्र कर्तव्यावर आहे. दि. 18/12/2023 रोजी तपासावर असलेला गुन्हा क. 372/23 कलम 457,380 भादवी मध्ये आरोपी नामे विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे वय 20 वर्ष रा म्हसोबा मंदीर जवळ, साठेनगर, वडाळागाव नाशिक यास क्राईम युनिट 2 चे पोउपनि संजय पाडवी यांनी त्यांचे कडुन रीपोर्टसह पोलीस ठाणे अमलदार यांचेकडे 17.25 वा. हजर केले. सदर आरोपीस पोलीस ठाणे अमलदार पोहवा / 165 झीरवाळ यांचे कडुन इंदिरा नगर पोलिसांनी 21.00 वा. ताब्यात घेवुन आरोपीस गुन्हयासंदर्भाने तिचारपुस केली. अधिक तपासाकरीता आरोपीस अटकेची आवश्यकता असल्याची खात्री झाल्याने त्यास त्याचे अटकेचे कारणे सांगितली.अटकेचा पंचनामा केला तसेच त्याचा धाकटा भाऊ अरुण ज्ञानेश्वर तीनबोटे यास फोन वर अटकेबाबतची माहीती दिली. 23.24 वा. सुमारास आरोपीची अटकेची नोंद स्टेशन डायरीला घेतल्यानंतर आरोपीस अंबड पोलीस स्टेशनचे लॉकअपला नेण्याची तयारी करत असतांना आरोपीने पाणी पिण्यास मागितल्याने आम्ही त्यास पोलीस स्टेशनचे चॅनेल गेटजवळील पाणी फील्टर जवळ येवुन त्यास पिण्यासाठी पाणी देत असतांना त्याने पोलिसाला धक्का दिला व तो चॅनेलगेटचे बाहेर संरक्षित भींतीवरुन उडी मारुन पळुन गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन आला नाही.तरी दि. 18/12/2023 रोजी 23.24 वा सुमारास गुन्हा क्र. 372/23 कलम 457,380 भादवी मधील आरोपी नामे विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे वय 20 वर्ष रा म्हसोबा मंदीर जवळ, साठेनगर, वडाळागाव, नाशिक याने त्याची सदर गुन्हयात होत असलेली अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या कायदेशीर हवालतीमधुन पळुन गेला म्हणुन त्याचेविरुध्द भादवी कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

ना. भुजबळांकडून लासलगावी पुलाच्या कामाची पाहणी

मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश लासलगाव : लासलगाव पाटोदा रस्त्यावरील

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

कांदासाठा घोटाळ्यावर हायकोर्टाची तत्काळ कार्यवाही

विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश पिंपळगाव : गेल्या दहा वर्षांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या

बडगुजर यांचा प्रवेश; काही पेच, काही संदेश

नाशिक बीट‌्स : प्रताप म. जाधव उबाठातून भाजपात स्वागत करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या

आता शिवसेनाप्रमुखांना अनुभवताही येणार!

गंगापूर रोडवरील स्मृती उद्यानात साकारणार ‘थ्रीडी होलोग्राम’ नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून एक कोटींचा अपहार; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी