Giorgia Meloni : युरोपात इस्लामला जागा नाही!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं मोठं वक्तव्य


रोम - इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Prime Minister of Italy Giorgia Meloni) या भारतातही कायम चर्चेत असतात. भारतात सोशल मीडियावर (Social Media) त्यांचा बराच ट्रेंड आहे. नुकत्याच त्यांच्या एका नव्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. 'इस्लामिक संस्कृती (Islamic culture) आणि यूरोप कल्चरमध्ये (Europe culture) काहीही साम्य नाही. त्यामुळे यूरोपात इस्लामला काही जागा नाही', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, आमची सभ्यतेची मूल्ये आणि इस्लामी मूल्ये यामध्ये साधर्म्य नाही. या दोन्ही संस्कृती परस्परविरोधी आहेत. त्यामुळे युरोपात इस्लामला काही जागा नाही. इटलीच्या इस्लाम सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरबकडून फंडिग होत आहे जिथं शरिया कायदा लागू आहे. युरोपाचं इस्लामीकरण सुरू आहे जे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून दूर आहे. त्यामुळे मुस्लिमांनी यूरोपापासून दूर राहावं असं वादग्रस्त विधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलं आहे.


जॉर्जिया मेलोनी यांचे हे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर समोर आले आहे. बेकायदेशीर प्रवाशांपासून यूरोपीय संस्कृतीला धोका असल्याचे सुनक यांनी म्हटलं होते. पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच इटली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अवैधरित्या यूरोपमध्ये वाढणाऱ्या प्रवासी संख्येवर त्यांनी भाष्य केले. अवैध प्रवाशांकडून यूरोपमध्ये वाढणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता मेलोनी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या