Nagpur Blast : नागपुरात भीषण स्फोट, ९ लोकांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नागपूर : नागपुरातील बाजारगाव येथील सोलार कंपनी 'एक्सप्लोसिव्ह'मध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास मोठा स्फोट (Nagpur Blast) झाला. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाली आहे. स्फोटात एकूण ९ लोकांचा मृत्यू तर ३ जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.


या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याचे समजत आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी दिली.


सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे. 'एक्सप्लोसिव्ह'मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’