Nagpur Accident News : लग्न आटोपून येत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाचा घाला

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) लग्न आटोपून परतत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. वर्‍हाडींची क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडली.


काल मध्यरात्रीच्या सुमारास एका क्वॉलीस कारमधून सात जण लग्न समारंभ आटोपून नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी परतत होते. पण रस्त्यातच समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.


अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२)
रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६)
वैभव साहेबराव चिखले (वय ३२)


अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई