Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीठाकरे गटाची पोलखोल! दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आमदार नितेश राणेंच्या पुराव्यांनी विधान भवन...

ठाकरे गटाची पोलखोल! दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आमदार नितेश राणेंच्या पुराव्यांनी विधान भवन हादरले!

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसआयटी चौकशीचे आदेश

नागपूर : ठाकरे गटाच्या नेत्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे केवळ आरोप न करता थेट फोटो आणि विडिओ आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत दाखवत याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर हे १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत काय करत होते? आणि यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. याबाबतचे फोटो दाखवत आमदार नितेश राणेंनी विधानसभेत ठाकरे गटाला जाब विचारला. या पुराव्यांनी विधान भवन हादरले असून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नागपूर मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर हे १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबत एका पार्टी मध्ये नाचतानाचा एक कथित व्हिडिओ आणि काही फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखवले. नितेश राणे यांनी विधानसभेत थेट फोटो दाखवत सुधाकर बडगुजर यांचे दहशतवाद्यांसोबत घनिष्ट संबंध असल्याचा आरोप केला आहे. ज्या १९९३च्या बॉम्बब्लास्टमुळे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देश हादरला. २५७ निरपराध लोकांनी आपला जीव गमावला. ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनजवळही बॉम्बब्लास्ट झाला. सेनाभवन उडवण्याचा कट रचण्यात आला. त्या बॉम्बब्लास्टचा मुख्य आरोपी दाऊद याचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता आज तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो पेरोलवर बाहेर येतो, त्यानंतर शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो, त्यात उबाठाचा कार्यकर्ता होता. सुधाकर बडगुजर हे नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच ते ठाकरे गटाचे नाशिक शहराध्यक्षदेखील आहेत. दहशतवादी अतिरेकी दाउदच्या एका जवळच्या सहकाऱ्यासोबत पार्टी करणं आणि अशा प्रकारचे जवळचे संबंध असणं ही अतिशय गंभीर बाब आहे. तसेच आता गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी या प्रकरणी चौकशी लावली तर, दूध का दूध पाणी का पाणी होईल तसेच अशा दहशतवाद्यांसोबत जर राजकीय पक्षांचे नेते पार्ट्या करायला लागले तर हे पुढे मात्र फार घातक ठरू शकतं असे अधिवेशनाबाहेर माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले.

भाजप नेते नितेश राणे यांच्यासह आशिष शेलार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखिल सदर प्रकरणी गांभीर्याने कसून चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

दादा भुसे यांनी या विषयावर बोलताना म्हटले की, आताच्या घडीचा देशाचा एक नंबरचा शत्रू दाउद इब्राहीम याचा राईट हँड सलीम कुत्ता हा एक शार्पशुटर असून ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर हे या सलीम कुत्ता सोबत पार्टी करत नाचत असल्याचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. ह्या प्रकारानंतर सुधाकर बडगुजर बाहेर राहीला तर, पुन्हा १९९३ ची पुरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, असे म्हणत दादा भुसे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ज्या सलीम कुत्तामुळे शेकडो लोकं मेलीत त्याच्यासोबत पार्ट्या करणं ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. या कुत्ता-बिल्लीवर लवकरात लवकर कारवाई करा. ह्या फेक पेंग्विन पार्टीची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

सुधाकर बडगुजर ठाकरे गटाचा नाशिकचा महानगरप्रमुख जो नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी पोट भरण्यासाठी आला होता आणि तो आता अचानक शेकडो कोटींचा मालक झाला आहे. हा बडगुजर अशा देशद्रोह्यांसोबत डान्स आणि पार्ट्या करतोय तर त्यांच्या फार्महाउसवर ह्या अशा पार्ट्या चालतात. ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत काही पुरावे नष्ट होण्याची देखील चिन्हे असताना याप्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली.

दरम्यान, हा बडगुजर पॅरोल वर बाहेर होता. खरंतर तो बाहेर असताना त्याला पार्टी करता येणं शक्य नसताना तरीही बडगुजर हा मुंबई बॉम्बस्फोटात सामील असलेल्या सलीम कुत्ता सोबत त्यांच्या फार्महाऊस वर पार्ट्या करताना आणि नाचताना दिसतो. कुत्ता सोबत त्या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे तपासले जाईल. ह्या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -