Shreays Talpade And Tripti Dimri : 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीला बॉलिवूडमध्ये आणलं श्रेयस तळपदेने!

काय आहे दोघांचं नातं?


मुंबई : मराठी आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreays Talpade) सध्या त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. काल 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) चित्रपटाचं शूटिंग उरकून घरी परतल्यावर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्जही मिळणार आहे. तर दुसरीकडे आणखी एका गोष्टीमुळे श्रेयस चर्चेत आला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरीला बॉलिवूडचा रस्ता श्रेयसने दाखवला आहे. श्रेयस तळपदेच्या तृप्ती डिमरीसोबतच्या (Tripti Dimri) या गोष्टीची सध्या चर्चा रंगली आहे.


श्रेयस तळपदेने 'पोस्टर बॉईज' (Poster Boyz) या हिंदी सिनेमाची सहनिर्मिती व दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol) आणि श्रेयस प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात श्रेयसने तृप्तीलाही काम करण्याची संधी दिली होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. तृप्तीने श्रेयसच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. यामुळे श्रेयस तळपदेला तृप्ती डिमरीचा गॉडफादरही म्हटले जाते.


'अ‍ॅनिमल' पुर्वी तृप्ती बाबिल खानसोबत 'कला' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यासोबत ती इम्तियाज अलीच्या 'लैला मजनू' या चित्रपटात दिसली. अ‍ॅनिमल चित्रपटाने तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. तर श्रेयस तळपदेने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो खूप लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'इकबाल', 'अपना सपना मनी मनी', 'ओम शांती ओम', 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल ३', 'हाऊसफुल २' आणि 'गोलमाल अगेन'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,