Sharad Pawar : जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाकडे?


मुंबई : दिल्ली येथे १९ तारखेला होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा पडला आहे. पवारांच्या या विधानाने महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.


नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. याआधी नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल, असा दावा करण्यात आला होता. हा दावा शरद पवारांनी खोडला आहे.


ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल म्हणाले होते की, शरद पवार यांनी नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत.

Comments
Add Comment

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)

Pune Crime :  पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर