सोन्याची कमाल, फँटसीची धमाल…

Share
  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

गेल्या काही दिवसांपासून देशात सोने तळपतेय. यामागील कारणांचा वेध घेताना भविष्यातील गुंतवणुकीची दिशा स्पष्ट होत आहे. दरम्यान, देशातली आभासी मैदानेही गजबजताना दिसत आहेत. अलीकडे पार पडलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या काळात गेमिंग प्लॅटफॉर्मवरील फँटसी स्पोर्टस कंपन्यांनी केलेली कामगिरी चकीत करत आहे. त्याच वेळी देशातल्या ‘ग्रे मार्केट’मध्ये काय चालते, याचा एक लक्षवेधी आढावाही समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात सोने तळपतेय. यामागील कारणांचा वेध घेताना महत्त्वपूर्ण अर्थकारण समोर येत आहे. यामुळे भविष्यातील गुंतवणुकीची दिशा स्पष्ट होत आहे. दरम्यान, देशातली आभासी मैदानेही गजबजताना दिसत आहेत. अलिकडे पार पडलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये गेमिंग प्लॅटफॉर्मवरील फँटसी स्पोर्टस कंपन्यांनी केलेली कामगिरी अनेकांना चकीत करत आहे. या विश्वातले अर्थकारण अर्थविश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्याकडे सोन्यातील गुंतवणुकीस नेहमीच समृद्धीचे कोंदण लाभले असून आर्थिक उन्नतीबरोबरच लक्ष्मीचे वरदान म्हणूनही याकडे पाहिले जाते. सध्या सोन्यातील हीच गुंतवणूक अनेकांना लखपती बनवत असून या मौल्यवान धातूचे विक्रमी चढे भाव आर्थिक विश्वामध्ये महत्वाचे स्थान मिळवत आहेत. लग्नसराईचा काळ लक्षात घेता पुढील काळही सोन्यातील तेजी कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या मते, यूएस डॉलर इंडेक्स आणि यूएस बेंचमार्क बाँड यील्डमध्ये मोठी घसरण झाल्याच्या परिणामस्वरुप आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत नेत्रदीपक वाढ बघायला मिळत आहे. सोन्यावर कोणतेही व्याज किंवा उत्पन्न नसल्यामुळे यूएस बाँड उत्पन्नात घट झाल्याने गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने अधिक आकर्षक बनते आणि पिवळ्या धातूच्या किमती वाढतात. असे असताना दहा वर्षांच्या यूएस ट्रेझरी बाँडवरील उत्पन्न सध्या दोन महिन्यांहून अधिक काळातील सर्वात कमी पातळीवर आहे. नोव्हेंबर महिना अमेरिकन डॉलर निर्देशांकाच्या कामगिरीच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात सर्वात वाईट ठरला आहे. त्यामुळे सोन्यासह डॉलरमूल्य असणार्या इतर वस्तूंच्या किमतींमध्येही चांगली वाढ बघायला मिळत आहे. जागतिक पातळीवर महागाईचा उच्च दर आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळेही सोन्याचे दर चढे राहताना दिसत आहेत. दुसरीकडे, भौगोलिक तसेच राजकीय तणाव, विशेषत: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असणारा लष्करी संघर्ष लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गुंतवणूक पर्याय म्हणून पिवळ्या धातूची मागणी वाढली आहे. याशिवाय मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या सततच्या खरेदीमुळेही काही प्रमाणात किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीमध्ये मध्यवर्ती बँकांनी ३३७.१ टन सोन्याची निव्वळ खरेदी केली आहे. तिसर्या तिमाहीमध्ये सोन्याच्या खरेदीचा हा दुसरा सर्वात मोठा विक्रम आहे. गेल्या वर्षी या काळात मध्यवर्ती बँकांकडून सर्वाधिक म्हणजेच विक्रमी ४५९ टन निव्वळ सोने खरेदी करण्यात आले होते. या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीपर्यंत म्हणजेच एकूण नऊ महिन्यांबद्दल बोलायचे तर मध्यवर्ती बँकांनी केलेली सोनेखरेदी ८०० टनांपर्यंत वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी कमकुवत झाला तर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीतील वाढ आंतरराष्ट्रीय किमतींपेक्षा जास्त असू शकते. भारतीय रुपयाच्या कमकुवत स्थितीमुळे सोने आयात करणे अधिक महाग होते हे यामागील कारण आहे.

अलीकडेच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला जेतेपद पटकावता आले नसले तरी देशातील फँटसी स्पोर्टस कंपन्यांनी दमदार कामगिरी केली. क्रिकेट विश्वचषकादरम्यान कल्पनारम्य क्रीडा कंपन्यांचे सक्रिय वापरकर्ते तब्बल ६० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले असून या कंपन्यांनी विक्रमी महसूल मिळवल्याचे बाजारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. काल्पनिक गेमिंग प्लॅटफॉर्म असणार्या ‘स्पोर्ट्सबाजी’ (पूर्वी बॅटिंग) या कंपनीने गेल्या महिन्याच्या तुलनेत वापरकर्त्यांच्या संख्येत ६० टक्के वाढ अनुभवली आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान कंपनीकडे चार लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते होते. तज्ज्ञांच्या मते, नवी जीएसजी प्रणाली लागू केल्यानंतर ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे अर्थविश्वासाठी खूप महत्त्वाची होती. गेल्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत यावेळी प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या २.१५ पट वाढली आणि महसूलही मागील स्पर्धेच्या तुलनेत अडीचपट वाढला. वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गेमिंग युनिकॉर्न ‘ड्रीम ११’च्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्याही २० कोटींच्या पुढे गेली आहे. आपल्या कंपनीच्या महसुलात ४० टक्के वाढ झाल्याचे ‘माय टीम ११’चे सहसंस्थापक आणि सीईओ विनीत गोदारा सांगतात. आयपीएलच्या तुलनेत वर्ल्ड कपदरम्यान त्यांच्या अॅक्टिव्ह बेस वापरकर्त्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली.

या वाढीचे सर्वात मोठे कारण ‘प्राइम टाइम’मध्ये भारतात झालेली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि विराट कोहली तसेच रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कंपनीने विश्वकरंडकातील सर्व सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग केले होते. विश्वचषकादरम्यान फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या वाढण्यात जाहिरातींनीही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे उद्योग निरीक्षकांचे म्हणणे आहे. ‘एम फिल्टर इट’ या जाहिरात विश्लेषक फर्मच्या अहवालानुसार स्पर्धेच्या चौथ्या आठवड्यात भारताच्या सामन्यांसाठी जाहिरात स्लॉट इतर सामन्यांच्या सरासरी जाहिरात स्लॉटच्या तुलनेत १४२ टक्क्यांनी वाढले. फँटसी स्पोर्टस कंपन्यांचा महसूल २०२२ मध्ये ३१ टक्क्यांनी वाढून तब्बल ६,८०० कोटी रुपये झाला. फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्टस आणि डेलॉइट इंडियाच्या अहवालानुसार, २०२७ पर्यंत हा आकडा २५,२४० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. ३०० पेक्षा जास्त फँटसी स्पोर्टस कंपन्या प्लॅटफॉर्म आणि १८ कोटी वापरकर्त्यांसह भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी कल्पनारम्य क्रीडा बाजारपेठ असणे ही निश्चितच अभिमानाची बाब म्हणायला हवी.

आर्थिक चर्चेवेळी अनेकदा ‘ग्रे मार्केट’ हा शब्द कानी येतो. ग्रे मार्केट हा एक अनधिकृत आणि अनियंत्रित बाजार असून तिथे एक्सचेंजेसवर सूचिबद्ध होण्यापूर्वीच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. एनएसई किंवा बीएसई सारख्या एक्सचेंजेसवरील ट्रेडिंगच्या विपरीत, ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग होते. मात्र असा व्यापार नियामक चौकटीच्या बाहेर येत असला तरी बेकायदेशीर मानला जात नाही. या व्यवहारांची चर्चा अर्थविश्वात पहायला मिळत आहे. ग्रे मार्केट प्रीमियम ही अतिरिक्त किंमत असते, जी गुंतवणूकदार शेअर बाजारावर सूचीबद्ध होण्यापूर्वी इश्यू किमतीवर वा त्यापेक्षा जास्त प्रमाणात देण्यास तयार असतात. उदाहरणार्थ आयपीओसाठी इश्यू किंमत ५०० रुपये असेल आणि स्टॉक ग्रे मार्केटमध्ये ५२० रुपयांच्या वर ट्रेडिंग करत असेल तर आयपीओचा जीएमपी २० रुपये असेल.

ग्रे मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी खरेदीदार ग्रे मार्केट ब्रोकरशी संपर्क साधतात आणि प्राइस बँड किंवा प्रीमियमवर खरेदी करण्याची ऑफर देतात. नंतर ब्रोकर्स आयपीओसाठी अर्ज केलेल्या संभाव्य विक्रेत्यांशी संपर्क साधतात. एखादी व्यक्ती अर्ज केलेले शेअर्स विकते तेव्हा त्याला स्टॉक कोणत्या स्तरावर सूचीबद्ध केला जाईल याची खात्री नसते, तसेच तो सूचीबद्ध होईपर्यंत स्वत:कडे ठेवण्याची जोखीम ती घेऊ इच्छित नसते. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ग्रे मार्केटमध्ये शेअर्सचे कोणतेही भौतिक हस्तांतरण होत नाही. एकदा विक्रेत्याला शेअर्सचे वाटप झाल्यानंतर विक्रेता ते ब्रोकर्सद्वारे शेअर्स खरेदीदारांना हस्तांतरित करतो. हे व्यवहार रोखीने होतात. सर्व व्यवहार सूची किंमतीवर निकाली काढले जातात. सूचीबद्ध किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमतीमध्ये काही फरक असेल तर तो सूचीच्या दिवशी निकाली काढला जातो. त्यामुळेच अनेक आयपीओंमध्ये लिस्टिंगच्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता व्हॉल्यूम खूप जास्त असतो. अशा व्यवसायांचा धोका हा आहे की ते एक्सचेंज आणि सेबीच्या कक्षेत येत नाहीत.त्यामुळे दबक्या आवाजात का होईना, त्यांची चर्चा सुरू असते.

Recent Posts

MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…

36 seconds ago

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

6 hours ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

6 hours ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

6 hours ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

6 hours ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

7 hours ago