Dhiraj Sahu black money : 'कहां से लोग इतना काला धन जमा कर लेते है?' धीरज साहूंचं जुनं ट्विट व्हायरल

आता स्वतःकडेच सापडले ३५१ कोटी; अजूनही पैशांची मोजणी सुरुच


मुंबई : काँग्रेसचे (Congress) राज्यसभेतले खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने (Income Tax Department) धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून आयकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्या कार्यालयातील कपाटात ठासून भरलेले नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावून गेले. धीरज साहू यांनी नोटांचे असंख्य बंडल कपाटांमध्ये ठासून भरले होते. या छापेमारीत आतापर्यंत ३५० कोटी रुपयांहून अधिक रोकड आयकर विभागाच्या हाती लागली आहे.


या पार्श्वभूमीवर धीरज साहू यांचं एक जुनं ट्वीट (Tweet) व्हायरल झालं आहे. या ट्विटमुळे काँग्रेसची बोलती बंद होणार आहे. हे ट्वीट त्यांनी २०२२ मध्ये १२ ऑगस्ट रोजी केलं होतं. त्यात ते म्हणतात, 'नोटबंदीनंतरही देशात एवढा काळा पैसा (Black Money) आणि भ्रष्टाचार (Corruption) आहे की ते बघून मन व्यथित होतं. लोक एवढा पैसा नेमका आणतात कुठून, हे माझ्या लक्षातच येत नाही. या देशामध्ये जर कोणी भ्रष्टाचाराला आळा घालणार असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे'. असं ट्वीट साहू यांनी केलं होतं. मात्र आता त्यांच्याकडेच काळा पैसा सापडल्याने ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत.



काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या ओडिशा येथील डिस्टिलरी कंपनीविरोधात आयकर विभागाने मोहीम उघडली आहे. साहू यांचं घर आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर मागील पाच दिवसांपासून तपास सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ३५१ कोटी रुपये अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही रक्कम मोजता मोजता पैसे मोजणारी मशीनच थकून बंद पडली. तरीही नवीन मशीन्स मागवण्यात आल्या असून पैशांची मोजणी सुरुच आहे.

Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले