Shivshahi fire accident : चांदोरी नजीक धावत्या शिवशाहीला भीषण आग

जीवित हानी टळली


निफाड : निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर (Nashik to Chhatrapati Sambhajinagar) राज्य मार्गावर रविवार दि. १० डिसेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला (Shivshahi Bus) भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील २५ प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली. शिवशाही बस क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७ ही बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बस मध्ये इंजिनच्या बाजूने दूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. वाहकाने तात्काळ बस थांबवून सतर्कतेने बस मधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस जळली.


सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे, भाऊ कर्डिले, किरण वाघ, सुरज पगारे, सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टरले, घटनास्थळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या