कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डबे घसरले, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत

नाशिक: कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.


कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.


कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. TGR 3 जवळ मुख्य मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.


मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याojcस खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.सी एस एम टी हावडा आणि सी एस एम टी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा कोणताही परिणाम नाही.

Comments
Add Comment

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या