रायपूर : छत्त्तीसगडमध्ये नव्या संसाराची स्वप्न पाहणार्या एका जोडप्यासह तीन नातेवाईकांचा भीषण अपघातात (Chhattisgarh Accident) अंत झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक (Truck-Car Accident) दिल्याने हा अपघात झाला. अपघातात नववधू-नवरदेवासह (Bride-Groom) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून बालोदा येथे परतत होती. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना भरधाव ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.
उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढून जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं काल रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते. परंतु अपघातात नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…