Theatres for Marathi Movies : अभिनेता प्रसाद खांडेकरची व्यथा आणि देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

प्रवीण दरेकरांनी विधानपरिषदेत 'तो' मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आणला


नागपूर : आज विधान परिषदेच्या (Legislative Assembly) कामकाजादरम्यान सभागृह नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. मराठी चित्रपटांना (Marathi Movies) चित्रपटगृह (Theatres) उपलब्ध होत नाहीत, ही मराठी कलाकार (Marathi artists) आणि निर्मात्यांची अनेक वर्षांपासूनची खंत आहे. आज प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) या हास्यजत्रा फेम अभिनेत्याची खंत प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत मांडून हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठी सिनेमांसाठी चित्रपटगृह मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.


प्रवीण दरेकर म्हणाले, “बोरीवलीतले एक कलाकार आहेत प्रसाद खांडेकर. त्यांचा 'एकदा येऊन तर बघा' हा मराठी सिनेमा ८ डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. मात्र सिनेमातले काही बॉस आणि दादा लोक आहेत जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळू देत नाहीत. प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे. सामान्य कुटुंबातून आलेला कलाकार आहे. त्याच्या मराठी सिनेमाला तातडीने सिनेमागृह उपलब्ध करुन द्यावं. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं. ” अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली.





यावर देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं आहे. "प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. जर त्यांच्या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईही केली जाईल. मात्र थिएटर उपलब्ध करुन दिलं जाईल.” असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.


प्रसाद खांडेकर याने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला 'एकदा येऊन तर बघा' नावाचा चित्रपट येत्या ८ डिसेंबर म्हणजे उद्याच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात आहे. शिवाय प्रसादनेही स्वतः यात अभिनय केला आहे.


फुलंब्रीकर नावाच्या भन्नाट कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत सांगणारी गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरू तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गंमतीशीर गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हे कुटुंब प्रेक्षकांना निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या