NCRB Report: देशात अपहरणाची १ लाखाहून अधिक प्रकरणे, या राज्यात सर्वाधिक आत्महत्या

नवी दिल्ली: भारतात २०२२ या वर्षात अपहरणाची एक लाखाहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली. या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या स्ानावर आहे. एनसीआरबीच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली.


ऱाष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार देशात अपहरणाची दिवसाला २९४हून अधिक तर प्रत्येक तासाला १२ हून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आले. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार २०२२मध्ये देशात प्रति एक लाख लोकसंख्येनुसार गुन्ह्याचा दर ७.८ टक्के इतका होता. तर अशा गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचा दर ३६.४ टक्के होता.



कुठे किती प्रकरणे?


केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीच्या माहितीनुसार २०२२मध्ये देशात अपहरणाची १,०७,५८८ प्रकरणे दाखल झाली. गेल्या वर्षी हा आकडा १०१,७०७ आणि २०२०मध्ये ८४,८०५ होता. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दिल्लीत २०२२मध्ये अपहरणाची ५६४१, २०२१मध्ये ५,५२७ आणि २०२०मध्ये ४,०६२ प्रकरणे दाखल करण्यात आली. उत्तर प्रदेशात २०२२मध्ये अपहरणाचे सर्वाधिक १६, २६२ प्रकरणे दाखल झाली.



आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक कुठे?


एनसीआरबीच्या ताज्या रिपोर्टनुसार सिक्कीममध्ये आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येनुसार आत्महत्येचा दर ४३.१ टक्के इतका आहे. यानंतर अंदमान आणि निकोबार बेटावर ४२.८ टक्के, पाँडिचेरीमध्ये २९.७ टक्के, केरळमध्ये २८.५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये २८.२ टक्के आहे.



देशात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण


देशभरात २०२२मध्ये एकूण १,७०,९२४ जणांनी आत्महत्या केल्या. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये २०२२मध्ये २९३ आत्महत्येची प्रकरणे समोर आली. २०२१च्या तुलनेत ही संख्या २७ ने अधिक आहे. सिक्कीममध्ये एकूण २२६ पुरुष आणि ६७ महिलांनी आत्महत्या केली. गेल्या वर्षी या राज्यात आत्महत्येचे हे अधिक प्रमाण बेरोजगारीमुळे झाले.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी

kedarnath yatra animal cruelty : भक्तीच्या नावाखाली क्रूरतेचा कळस! केदारनाथमध्ये मृत घोड्याला फरफटत नेले आणि...हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंड : उत्तराखंडमधील निसर्गरम्य आणि पवित्र 'छोटा चार धाम' पैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये सध्या यात्रेची

Chamba Accident : हिमाचलमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या कारमुळे ७ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील चंबा (Chamba) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव कार खोल दरीत

Snake Bite Death Odisha : ओडिशा हादरले: सर्पदंशाने आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा करुण अंत; रुग्णालयात जमावाचा राडा आणि डॉक्टरांना अमानुष मारहाण

मलकानगिरी : ओडिशा राज्यातील मलकानगिरी (Malkanagri) जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली