मुंबई : लग्न करताना प्रचंड उत्साही होत सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज शेअर करणं आणि काही दिवसांतच जोडप्याची घटस्फोटाची बातमी येणं यात आता काही नवीन राहिलेलं नाही. किंबहुना अनेक कलाकार घटस्फोटानंतर दुसरा जोडीदारही लगेच निवडतात. अनेकजण या गोष्टीला पाठिंबा दर्शवत असले तरी दुसरीकडे अनेकजण त्यांना ट्रोलही करतात. पण ट्रोल करणार्यांकडे ही जोडपी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात.
हल्ली अनेक मराठी कलाकारही सर्रास घटस्फोट आणि पुन्हा लग्न करत आहेत. मराठी कलाकारांनी असं वागलेलं चाहत्यांना मात्र रुचत नाही. अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता पीयुष रानडे (Piyush Ranade) याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. पीयुषने सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) या मराठी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं आहे. या जोडप्याने आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social media) लग्नाचे फोटोज शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यावर अनेक मराठी कलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर दुसरीकडे पीयुषला तिसर्या लग्नासाठी ट्रोल करण्यात आलं आहे.
नेटकर्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ‘अरे हा किती लग्नं करणार? हे तिसरं लग्न’ असं म्हणत पीयुषला ट्रोल केलं आहे. तर एकाने ‘हे लग्न तरी कृपया टिकव’ असा सल्ला दिला आहे. दुसर्या एका युजरने सुरुचीला ‘मॅम जरा विचार तरी करायचा होता’, असा सल्ला दिला आहे.
अभिनेता पीयुष रानडेने पहिल्यांदा २०१० साली शाल्मली टोळ्ये (Shalmali Tolye) या अभिनेत्रीसोबत विवाह केला होता. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने अभिनेत्री मयुरी वाघशी (Mayuri Wagh) लग्नगाठ बांधली. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती आणि काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास दोन वर्षे त्यांनी मालिकेत सोबत काम केले आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. पण हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही.
पीयुष रानडेने आता सुरुची अडारकरसोबत विवाह केला आहे. पीयुष आणि सुरुचीने एकत्र ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत काम केले होते. या दरम्यानच त्यांचे सूत जुळले असल्याची शक्यता आहे. त्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सुरुची देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर पीयुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…