Ole Aale teaser : नाना पाटेकर पुन्हा एकदा घालणार धुमाकूळ...

'ओले आले'चा भन्नाट टीझर आऊट! सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरेही मुख्य भूमिकेत दिसणार


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi film industry) सध्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या चित्रपटांची रांगच लागली आहे. एकाच दिवशी दोन ते तीन चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. यात आणखी एक नवा चित्रपट म्हणजे नाना पाटेकरांना (Nana Patekar) पुन्हा एकदा कॉमेडी (Comedy) रुपात प्रेक्षकांसमोर आणणारा 'ओले आले'. हा चित्रपट येत्या वर्षात ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ओले आले'चा भन्नाट टीझर आऊट (Teaser Out) झाला आहे. नुकतंच 'झिम्मा २' या चित्रपटातून धुमाकूळ घालत असलेले सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र! ओले आले' असं कॅप्शन देत काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. 'ओले आले'चं दिग्दर्शन विपुल महेता यांनी केलं आहे, तर रश्मिन मजीठिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सचिन-जिगर यांनी या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.





एका धमाल विनोदी बापाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात सुरुवातीला आपल्याला नाना पाटेकर पाठमोरे योगा करताना दिसतात. मागून सिद्धार्थ चांदेकरच्या पात्राचा आवाज आपल्याला ऐकू येतो. तो म्हणतो, जनरली बाप कसा असतो? वक्तशीर, सगळं अगदी कसं एकदम टाईम टू टाईम. कर्तव्यनिष्ठ म्हणजे रिस्पॉन्सिबल. जबाबदार - रुबाबदार. कायम खंबीर पण सतत गंभीर. पण माझा... असं म्हणताच नाना पाटेकर यांचा धम्माल अंदाज पाहायला मिळतो.


नाना पाटेकर नाचताना, मजेत आयुष्य जगताना दिसतात. अगदी लहान मुलासारखे नाना खोडकरपणाही करतात. सोबतच मकरंद अनासपुरेंची देखील एक झलक यात पाहायला मिळते. 'चला फिरुया, हसूया, जगूया' असं या सिनेमाच्या पोस्टरवर लिहिलं आहे. सोबतच ऐकू येणारं ओले आलेचं थीम गाणंही कमाल झालं आहे. या टीझरमधून हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवणार याची प्रचिती येते.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात