Ranbir Kapoor Animal : प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'ॲनिमल'च्या निर्मात्याचं झालं नुकसान!

  259

रणबीरलाही बसणार झटका... काय आहे कारण?


मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या 'ॲनिमल' (Animal) चित्रपटाची तुफान हवा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र दिसले आहेत. तसंच या सिनेमात बॉबी देओलही (Bobby Deol) एका विशेष भूमिकेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची जबरदस्त चर्चा होती. प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत होते. अखेर आज हा सिनेमा रिलीज झाला, पण अवघ्या काही तासांतच 'ॲनिमल'च्या निर्मात्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे, ज्यामुळे त्याचं मोठं नुकसान होणार आहे.


रणबीरचा 'ॲनिमल' सुपरहिट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. ॲडव्हान्स बुकिंगमध्येही (Advanced Booking) या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली. पण आता या सिनेमाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. कोट्यावधी रुपये असलेला हा बिग बजेट सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक (Online Leak) झाला आहे. त्यामुळे अभिनेत्याला मोठा फटका बसला आहे. तसेच निर्मात्यांचं देखील कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.


सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित झाला की तो ऑनलाईन लीक होण्याचं चित्र काही नवं नाही. 'जवान' (Jawan), 'पठाण' (Pathaan) आणि 'टायगर ३' नंतर (Tiger 3) रणबीरचा 'ॲनिमल' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. फिल्मीवैप (Filmywap), तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) आणि फिल्मीजिला (Filmyzilla) या साईट्सवर हा सिनेमा HD क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. त्यामुळे 'ॲनिमल'ची टीम हैराण झाली आहे. याचा सिनेमाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होणार आहे.



तरीही 'ॲनिमल'ची सुरु राहणार घोडदौड


सिनेमा ऑनलाईन लीक झालेला असला तरी रणबीर-रश्मिकाचे चाहते मात्र चित्रपटगृहात जाऊनच सिनेमा पाहतील यात शंका नाही. त्यामुळे सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box office) दणदणीत कमाई करणार आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'ॲनिमल' ४० कोटींपेक्षा अधिक कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई