Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनी शिंगणापूरात येथे केली शनी देवाची पूजा

शनिशिंगणापुर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता. नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,‌ जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.


महामहिम राष्ट्रपतींनी शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनी देवाच्या शिळेवर तेल अर्पण करून पूजा केली. यावेळी राज्यपालही उपस्थित होते.


राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक करत चौथ-यावर जाऊन शनीदेवाच्या मूर्तीवर तेल अर्पन करत दर्शन घेतले.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. तसेच श्री शनैश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, अनिल दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.


शनीदेवाचे दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले. तसेच पुढील नियोजीत दौर्‍यासाठी दिल्लीला रवाना झाल्या.


राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्याने प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी केली होती. सकाळपासूनच शनीमंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. केंद्र व राज्याची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा विभाग, जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग तसेच शनैश्‍वर देवस्थानच्या वतीने उत्तम नियोजन केले होते.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई