Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीTribal Dance : भाजपा प्रदेशाध्यक्षांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

Tribal Dance : भाजपा प्रदेशाध्यक्षांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

संगमनेरमध्ये घर चलो अभियानात आदिवासी संस्कृतीचे दर्शन

अकोले : आदिवासी समाजाची संस्कृती व कलेचे दर्शन असणारे आदिवासी कांबड नृत्यात (tribal dance) सहभागी होण्याचा मोह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आवरला नाही. त्यातील ढोल वाजवत त्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

संगमनेर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियानाचे निमित्ताने आले होते. या अभियानात भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आयोजन केले होते. या नृत्याने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे देखिल या नृत्यात सामील झाले. यात ढोल वाजवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. या आदिवासी तरुणाकडून वाद्याविषयी माहिती जाणून घेतली. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आदिवासी समाजाच्या नृत्यात सहभागी होऊन ठेका धरतो याचे सर्वांना आश्चर्य वाटले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिर्डी लोकसभा संयोजक राजेंद्र गोंदकर, सचिन तांबे, वैभव लांडगे, श्रीराम गणपुले हेही सहभागी झाले.

दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभुंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार असून यासाठी अकोले तालुक्यातून किती नागरिकांना अयोध्या दर्शन घडविणार असे वैभवराव पिचड यांना समारोप सभेत विचारले असता ५००० पेक्षा जास्त रामभक्तांना अयोध्येला नेणार असल्याचे भाजप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले.

कोपरगाव, संगमनेर व अकोले तालुक्यातील सुपर वारियर्स यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या सुपर वॉरियर्सच्या बैठकीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त संख्येने सुपर वारियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचेही कौतुक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले. भाजपा सुपर वॉरीयरर्सच्या बैठकीत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्याची छाप दिसून आली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, अकोले तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, तालुका सरचिटणीस राहुल देशमूख, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, कार्यालयीन सचिव अशोक आवारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -