नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही वाचले असेल की काही देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची(visa) गरज नसते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशांचे लोक भारतात व्हिसाशिवाय येऊ शकतात. जर तुम्हाला हे माहीत नाही तर हैराण होण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या देशातील लोक व्हिसाशिवाय भारतात फिरू शकतात.
कोणते लोक व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतात
गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार केवण दोन देशांतील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय भारतात येऊ शकतात. या देशातल लोक जमिनीच्या रस्त्याने येऊ देत अथवा हवाई मार्गाने अथवा जहाजाने भारतात आले तरी त्यांना व्हिसा अथवा पासपोर्टची गरज आहे.
हे दोन्ही देश भारताच्या शेजारील देश आहे आणि या देशांसोबत अनेक दशकांपासून भारताचे संबंध चांगले आहेत. दरम्यान, या लोकांकडे व्हिसा अथवा पासपोर्ट जरी नसला तर त्यांच्याकडे आपल्या देशाचे नागरिकत्व सर्टिफिकेट अथवा मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. दरम्यान, काही स्थितींमध्ये तर या देशातील लोकांकडे व्हॅलिड पासपोर्ट असला तर भारतात एंट्रीही मिळते.
कोणत्या स्थितीत होते असे
गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेव्हा एखादी नेपाळची व्यक्ती अथवा भूतानची व्यक्ती चीन, मकाऊ, हाँगकाँग, पाकिस्तान अथवा मालदीव येथून भारतात येते तेव्हा त्यांच्याकडे आपल्या देशाचा व्हॅलिड पासपोर्ट असेल तर एंट्री मिळू शकते. तर जगातील ५७ देशांमध्ये भारतीय लोक व्हिसाशिवाय एंट्री करू शकतात.