Marathi Boards : अमराठी पाट्यांविरोधात महापालिकेची धडक कारवाई

मराठी पाटी नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड


मुंबई : मनसेने (MNS) अमराठी पाट्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला दुजोरा देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Boards) लावण्यासाठी दुकानदारांना २५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटून गेल्यावरही काहीजणांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) अशा दुकानांवर धडक कारवाई सुरु केली आहे.


मुंबई महापालिकेचे कर्मचारी आज सकाळपासूनच सर्व दुकानांची पाहणी करत आहेत. कुलाबा परिसरातील नाईकी स्पोर्टस ब्रँडच्या आऊटलेटवर महापालिकेने कारवाई केल्याचे समोर आले आहे. मराठी पाट्या नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड आकारणार, अशी माहिती आहे. आस्थापना टॅली प्रमाणपत्रावर (Establishment tally certificate) कामगारांचा जो आकडा असतो त्यानुसार दंड आकारला जातो, असं एका महापालिका अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.


मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर नवी मुंबईत मनसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. पुढील दोन दिवसांत मराठी पाट्या लावा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले आणि आंदोलन सुरु केलं. या मॉलमधील ज्या आस्थापनांवर मराठी पाट्या नाहीत त्यांना पुढील दोन दिवसांत त्या लावण्याचा निर्वाणीचा इशारा मनसेने दिला आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या