Marathi Boards : कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलला मनसेचा दणका!

मराठी पाट्या लावण्याची मुदत उलटून गेल्याने अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन


मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत (Marathi Boards) असाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला काही अमराठी व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या व्यापार्‍यांना दणका देत २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत पाट्या लागल्याच पाहिजेत, असा निर्णय दिला होता.


यानंतर ही मुदत उलटूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी पाट्या नसल्याचे चित्र आहे. यामुळेच मनसेने आठवडाभरापूर्वी 'पाट्या लागल्या नाहीत, तर मनसेचा खळखट्याक', असा मजकूर असलेले बॅनर्स लावत आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानुसार कुर्ल्यातील एका मॉलमध्ये मराठी पाटी न लावल्याने मनसेने आंदोलन सुरु केलं आहे. फिनिक्स मार्केटसिटी मॉल (Phoenix marketcity Kurla) या ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.


'सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला दोन महिने झाले आहेत. पण कुर्ल्यातील हा मॉल जाणुनबूजून आदेशाचे पालन करत नाही. मराठी भाषेचा ते सन्मान करत नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा निषेध नोंदवायला आम्ही इथे आलो आहोत आणि आता आम्ही मॅनेजमेंटसोबत मनसे स्टाईलने चर्चा करु. जोपर्यंत ते मराठी पाटी लावणार नाहीत तोपर्यंत कोणालाच मॉलमध्ये जाऊ देणार नाही', अशी भूमिका मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २५ नोव्हेंबरलाच महाराष्ट्रात सर्वत्र मराठी पाट्या लावणे आवश्यक होते. अमराठी पाट्यांविरोधात आजच कारवाई सुरु होणार होती. मात्र, आज सुटीचा दिवस असल्यामुळे कारवाई उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेने आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. मॉलच्या आतमध्ये शिरुन व्यवस्थापकांना जाब विचारणार, असा निर्धार मनसैनिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक