Kosla Marathi Movie : ज्ञानपीठ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' कादंबरीवर येणार सिनेमा!

२७ नोव्हेंबरला दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार घोषणा


मुंबई : भारतीय साहित्य (Indian Literature) क्षेत्रातील सर्वोच्च 'ज्ञानपीठ' (Jnanpith Award) पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या कोसला (Kosala) कादंबरीचे अनेक चाहते आहेत. पुण्यात शिक्षणासाठी एका छोट्याशा गावातून आलेल्या पांडुरंग सागवीकर या नायकाची द्विधा मनस्थिती दर्शवणारी ही कादंबरी. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे.


भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लिहिलेल्या या कादंबरीतून समाजाचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. अनेक वर्षे लोटली तरीही मराठी साहित्यविश्वात कोसला कादंबरीची चर्चा होते. अशातच कोसला कादंबरीसंबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.


नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर आता मराठी सिनेमा (Marathi Movie) येणार आहे. 'कोसला - उदाहरणार्थ मी' असं या सिनेमाचं नाव आहे. निर्माण स्टुडिओज आणि मेहूल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


२७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मुंबईत ही घोषणा होणार आहे. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, अच्युत पालव या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा होणार आहे. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच सिनेमाची संपूर्ण टीम आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. नेमाडेंच्या लोकप्रिय कोसला कादंबरीवर सिनेमा येणार असल्याने पुस्तकप्रेमी आणि सिनेप्रेमी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद

मराठा आरक्षणाचा पेच उच्च न्यायालयात! ओबीसी कोट्यातील अध्यादेशावर आता कोर्टाची नजर

मुंबई: मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी