Crime : वर्ल्डकपचा सामना आणि छट पुजा सुरू असतानाच सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई : मुंबईत एकिकडे वर्ल्डकपचा सामना आणि दुसरीकडे छट पुजा सुरू असतानाच कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह (Crime) आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.


सीएसटी रोड शांतीनगरच्या समोरिल बाजूला मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. या ठिकाणी एक बेवारस सुटकेस असल्याचा एक फोन रविवारी दुपारी कुर्ला पोलीस ठाण्यात आला. छट पुजा आणि वर्ल्डकप फायनलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तपास केला असता बॅगेत चक्क एका महिलेचा मृतदेह असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली. महिलेचा मृतदेह राजावाडी रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान या प्रकरणात खुनाची बाब स्पष्ट आहे. तसेच या महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४०च्या दरम्यान असून तिने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेली आहे. तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये दुमडलेल्या अवस्थेत होता. मात्र अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर या परिसरामध्ये कोणतीही महिला बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल झाल्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिसांकडून तिच्या फोटोवरून तिचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Israel Employment : इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवडलेल्या उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यातील १०६ उमेदवारांना औंध, पुणे येथे २७ ते ३१ जुलैदरम्यान प्रशिक्षण मुंबई(Mumbai) : राज्यातील युवकांना

Corporate Social Responsibility : महाराष्ट्रातील एकूण सीएसआर निधीपैकी ५१ टक्के एकट्या मुंबईत खर्च

वाटपात मोठी विषमता; मागास आणि दुष्काळी जिल्ह्यांच्या वाट्याला अतिशय तुटपुंजी रक्कम मुंबई(Mumbai) : कॉर्पोरेट सोशल

Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र