नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरु होणारी मेट्रो (Metro) गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अखेर आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. प्रवासात ११ स्थानके असणार्या या मेट्रोचा मुख्यतः खारघर आणि तळोजामधील लोकांना फायदा होणार आहे. बेलापूर ते पेणघर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. आज दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल.
१. बेलापूर टर्मिनल
२. आरबीआय कॉलनी
३.बेलपाडा
४. उत्सव चौक
५.केंद्रीय विहार
६. खारघर गाव
७. सेंट्रल पार्क
८. पेठपाडा
९. अमनदूत
१०. पेठाली तळोजा
११. पेणघर
अशी ११ स्थानके या मेट्रो प्रवासात असणार आहेत.
० – २ किमी : १० रुपये
२ – ४ किमी : १५ रुपये
४ – ६ किमी : २० रुपये
६ – ८ किमी : २५ रुपये
८ – १० किमी : ३० रुपये
१० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर : ४० रुपये
आज पहिली मेट्रो तीन वाजता धावणार असून उद्यापासून नियमितपणे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत मेट्रो धावणार आहे.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…