Onkar Bhojane : ओंकार भोजनेची हास्यजत्रेत एन्ट्री नव्हे; तर 'हे' कारण आलं समोर

  372

नम्रता संभेरावने केला खुलासा


मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajtra) या लोकप्रिय कॉमेडी शोचा (Comedy Show) नुकताच एक प्रोमो समोर आला होता. यात सगळ्यांचा आवडता अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) पुन्हा एकदा स्किट सादर करताना दिसला. काही कारणास्तव ओंकारनं मालिका सोडली होती, पण त्याला पुन्हा एकदा प्रोमोमध्ये पाहून चाहते भलतेच खुश झाले होते. मात्र, नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. ओंकार भोजने हास्यजत्रेत कायमची एन्ट्री करणार नसून त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी तो सेटवर आला असल्याचं समोर आलं आहे.


हास्यजत्रेत कॉमेडीची डबलडेकर अशी ओळख असलेल्या प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) लिखित दिग्दर्शित आगामी 'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात ओंकार भोजने झळकणार आहे. या सिनेमातील बहुतांश कलाकार हे हास्यजत्रेतीलच आहेत. त्यामुळे नव्या एपिसोडमध्ये हास्यजत्रेची टीम या सिनेमाचं दमदार प्रोमोशन करणार आहे. त्याच्याच निमित्ताने ओंकारनेही सेटवर हजेरी लावल्याचे समजत आहे.


हास्यजत्रेत जिच्या मॅडनेसला ठाव नसतो अशा नम्रता संभेरावने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये ओंकार भोजने असलेल्या हास्यजत्रेच्या एपिसोडचा प्रोमो शेअर करत तिने खाली कॅप्शन लिहिलं आहे की, 'मेरा भाई... आमचा सिनेमा एकदा येऊन तर बघा च्या निमित्ताने हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल…' त्यामुळे ओंकार कायमचा येणार नसून सिनेमाच्या प्रोमोशनसाठी आला आहे, हे स्पष्ट झालं आहे.





ओंकार भोजनेचा हा प्रोमोशनवाला एपिसोड येत्या शनिवार-रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता, मात्र चित्रपटगृहांमध्ये मराठी-हिंदी सिनेमांची वाढलेली गर्दी लक्षात घेता दोन आठवडे थांबण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई