Uttarakhand tunnel collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत २४ तासांनंतरही बचावकार्य सुरुच

  43

३६ मजूर अजूनही अडकून...


उत्तराखंड : दिवाळीमध्ये (Diwali) सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मात्र एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Tunnel collapsed) ३६ मजूर आतमध्ये अडकले आहेत. या घटनेला २४ तास उलटल्यानंतरही या मजूरांना बाहेर काढण्यात अद्याप यश आलेले नाही. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून या कामगारांसाठी पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.


बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे कळवले आहे. मात्र, २४ तासांहून अधिक काळ लोटल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पोकळीतून पडणारा ढिगारा शॉर्ट क्रिएटिंग मशीन वापरून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पण या प्रयत्नाला तितके यश येत नाही आहे.


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ''SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.'' त्यांनी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवल्याची माहिती दिली आहे.



पंतप्रधानांनीही फोनवरून घेतली माहिती


हिमाचल प्रदेश येथून परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तरकाशीच्या बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतली. पंतप्रधानांनी यासंबंधी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली.


Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या